भजनी मालिका
← भजनांकडे परत

तारले नामे अपार जन । ऐसें महिमान नामाचें

tarale name apar jan | aisen mahiman namachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तारले नामे अपार जन । ऐसें महिमान नामाचें ॥१॥ अधम तरले नवल काय । पाषाण ते पाहें तरियेले ॥२॥ दैत्यदानव ते राक्षस । नामें सर्वांस मुक्तिपद ॥३॥ एका जनार्दनीं नाम सार । जपा निरंतर हृदयीं ॥४॥