भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघें होऊनि कांहींचि नव्हे । आपुल्या स्वाभावें आपण

avaghen houni kanhinchi navhe | apulya svabhaven apan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अवघें होऊनि कांहींचि नव्हे । आपुल्या स्वाभावें आपण ॥१॥ तया नांव आत्मतत्व । शुध्द सत्व मायादी ॥२॥ ध्वनि बीज ओंकार रुप । तेंही स्वरुप ऐलाडी ॥३॥ निळा म्हणे जाणों जातां । जाणोनि नेणता वेद जेथें ॥४॥