भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघेंची सुख तयासी जोडलें । अवघे पाउलें देखतांची

avaghenchi sukh tayasi jodalen | avaghe paulen dekhatanchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघेंची सुख तयासी जोडलें । अवघे पाउलें देखतांची ॥१॥ अवघें ब्रह्मारुप नाहीं कांहीं चिंता । अवघाचि देखतां पांडुरंग ॥२॥ अवघे ते धन्य क्षेत्रवासी दैवाचे । एका जनार्दनीं वाचे विठ्ठल वदती ॥३॥