भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघे हो ऐका अवघे श्रवणीं । अवघेचि होऊनि एकचित

avaghe ho aika avaghe shravanin | avaghechi houni ekachit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवघे हो ऐका अवघे श्रवणीं । अवघेचि होऊनि एकचित ॥१॥ विठोबाचें नाम अवघेंचि गोमटें । विचारीम नेटेंपाटें आपुल्या मनीं ॥२॥ अवघी हेचि क्रिया अवघें हेंचि कर्म । अवघा हा स्वधर्म सत्य जाणा ॥३॥ अवघें हें सगुण अवघें हें निर्गुण । अवघें हें परिपूर्ण शुद्ध बुद्ध ॥४॥ अवघा हा आचार अवघा हा विचार । अवघा हा संसार सर्व काळ ॥५॥ अवघा जेणें दुरी ठाके भावभ्रम । निरंतर नाम गाय नामा ॥६॥