भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो या गेला पंढरपुरा । आणीक यात्रा न मनीं तो

jo ya gela pandharapura | anik yatra na manin to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जो या गेला पंढरपुरा । आणीक यात्रा न मनीं तो ॥१॥ सुलभ माय पंढरिराणा । पुरवी खुणा अंतरींच्या ॥ध्रु.॥ जन्मांतरिंच्या पुण्यरासी । वारी त्यासी पंढरीची ॥२॥ बाहेर येतां प्राण फुटे । रडें दाटे गहिवरें ॥३॥ दधिमंगळभोजन सारा । म्हणती करा मुरडींव ॥४॥ मागुता हा पाहों ठाव । पंढरिराव दर्शनें ॥५॥ तुका म्हणे भूवैकुंठ । वाळुवंट भींवरा ॥६॥