भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो जो धरसील भाव । तें तें देईल देव । ये अर्थी संदेह । मानूं नको

jo jo dharasil bhav | ten ten deil dev | ye arthi sandeh | manun nako

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जो जो धरसील भाव । तें तें देईल देव । ये अर्थी संदेह । मानूं नको ॥१॥ भावें भक्ति फळे । भावें देह मिळे । निजभावें सोहळे । स्वानंदाचे ॥२॥ एका जनार्दनीं । भावाच्या आवडी । मनोरथ कोडी । पुरवी तेथें ॥३॥