भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा

jo bhaktancha visava | ubha pacharito dhanva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जो भक्तांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥१॥ हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें ॥ध्रु.॥ भवसिंधू सुखें । उतरी कासे लावूनि थोर भक्तांची आस । पाहे भोंवताली वास ॥२॥ तुका म्हणे कृपादानी । फेडी आवडीची धणी ॥३॥