भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघीं तुज बाळें सारिखीं नाही तें

avaghin tuj balen sarikhin nahi ten

अवघीं तुज बाळें सारिखीं नाही तें । नवल वाटतें पांडुरंगा ॥१॥ म्हणतां लाज नाहीं सकळांची माउली । जवळीं धरीलीं एके दुरी ॥२॥ एकां सुख द्यावें घेऊनी वोसंगा । एके दारीं गळा श्रमविती ॥३॥ एकां नवनीत पाजावें दाटुन । एकें अन्न अन्न करितील ॥४॥ एके वाटतील नवजावी दूर । एकांचा मत्सर जवळी येतां ॥५॥ तुकयाबंधु म्हणे नावडती त्यांस । कासया व्यालास नारायणा ॥६॥