भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघें अवघीकडे । दिलें पाहे मजकडे । अशा सवंगडे । सहित थोरी लागली

avaghen avaghikade | dilen pahe majakade | asha savangade | sahit thori lagali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघें अवघीकडे । दिलें पाहे मजकडे । अशा सवंगडे । सहित थोरी लागली ॥१॥ कां रे धरिला अबोला । माझा वांटा देईं मला । सिदोरीचा केला । झाडा आतां निवडे ना ॥ध्रु.॥ भूक लागली अनंता । कां रे नेणसी जाणतां । भागलों वळितां । गाई सैरा ओढाळा ॥२॥ तुका करुणा भाकी । हरी पाहे गोळा टाकी । घेता झाला सुखी । भीतरी वांटी आणीकां ॥३॥