भजनी मालिका
← भजनांकडे परत

जरा पावली निजसंधी । अनिवार येती आधी व्याधीं

jara pavali nijasandhi | anivar yeti adhi vyadhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जरा पावली निजसंधी । अनिवार येती आधी व्याधीं ॥१॥ पायीं पडतसें वेंगडी । अधारीं धरणें लागे काठीं ॥२॥ डोळांचि पडे तोंडा लाळ । नाका येत शेंबूड वोंगळ ॥३॥ चुंबन देतां पोरांप्रती । बाऊ म्हणोनि पोरें पळती ॥४॥ ऐशी दशा येईल अंगा । एका जनार्दनीं शरण रिघा ॥५॥