भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयासी लागली रामनामाची गोडी । त्यानें केली प्रौढी परमार्थाची

jayasi lagali ramanamachi godi | tyanen keli praudhi paramarthachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जयासी लागली रामनामाची गोडी । त्यानें केली प्रौढी परमार्थाची ॥१॥ कलिमाजीं नाम सुलभ सोपारें । यालागीं आदर नामीं धरा ॥२॥ आणिक साधनें आहेती उदंड । सेवितां वितंड कष्ट तेथें ॥३॥ सोवळें ओवळें उंच नीच वर्ण । नाहीं येथें गुणदोष कांहीं ॥४॥ नामा म्हणे सर्व सिद्धांताचा भाव । प्राणियांचें दैव कोण जाणे ॥५॥