भजनी मालिका

भजने

क्षुधा तृषा कांहीं सर्वथा नाठवे । पहावया धांवें कोल्हांटासी ॥१॥ कथेसी साक्षेपें पाचारिला जरी । म्हणे माझ्या घरीं कोणी नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

क्षुधारथी अन्नें दुष्काळें पीडिलें । मिष्टान्न देखिलें तेणें जैसें ॥१॥ तैसें तुझे पायीं लांचावलें मन । झुरे माझा प्राण भेटावया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

क्षेत्रीं हा वृत्तांत कळला सर्वाशीं । आले पंचक्रोशी सभोंवते ॥१॥ धोंडोबा गणोबा होते ज्याचे रानीं । ते आले धांवोनि मागावया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

क्षेम मायबाप पुसेन हें आधीं । न घलीं हें मधीं सुख दुःख ॥१॥ न करीं तांतडी आपणांपासूनि । आइकेन कानीं सांगतीं तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

क्षोभ आणि कृपा मातेची समान । विभाग जतन करुनि ठेवी ॥१॥ क्षणभंगुर ते उपजली चिंता । खरी अखंडीता आवडीची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

खग मृग राक्षस वानर । दैत्य दानव निशाचर । सिध्दचारण विदयाधर । नागविखार कीटकादि ॥१॥ चतुष्पदें जळचरें मनुष्ययाति । दासी वेश्या भिल्ल्णिी किती । कोळी अंत्यज अधम जाती । उध्दरिले श्रीपति सत्संगें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

खगावरी स्वारी करूनियां देवा । धांवसी केशवा भक्तांसाठीं ॥१॥ रामा परशुरामा कृष्णा नारायणा । हरी संकर्षणा भक्तांसाठी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खंडन मुंडन दंडन करुनी घ्यती रुप । तें आम्हां सोपें झालें वर्णितां चिद्रुप ॥१॥ तो देखिला वो देखिला वो । पहाता पहाणें विसरुन गेलें ठक पडलें सकळां वो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खडा रवाळी साकर । जाला नामाचाची फेर । न दिसे अंतर । गोडी ठायी निवडितां ॥१॥ तुम्ही आम्ही पांडुरंगा । भिन्न ऐसे काय सांगा । चालविले जागा । मी हे माझे यासाठी ॥ध्रु॥

रचनाकार: संत तुकाराम

खंडेराया तुज करितें नवसू । मरूं देरे सासू खंडेराया ।। १ ।। सासू मेल्यावरी तुटेल आसरा मरूं दे सासरा खंडेराया ।।२।।

रचनाकार: संत जनाबाई

खद्योतें फुलविलें रविपुढें ढुंग । साक्षी तंव जग उभयतां ॥१॥ आपल्या आपण नाहीं शोभों येत । चार करी स्फीत दाखवूनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

खरें नानवट निक्षेपीचें जुनें । काढिलें ठेवणें समर्थाचें ॥१॥ मजुराच्या हातें मापाचा उकल । मी तों येथें फोल सत्ता त्याची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

खरें भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदमासी ॥१॥ संवगाचें केणें सांपडलें घरीं । भरूनि वैखरी सांटविलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम