भजनी मालिका
← भजनांकडे परत

खरें बोले तरी । फुकासाठीं जोडे हरी

kharen bole tari | phukasathin jode hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खरें बोले तरी । फुकासाठीं जोडे हरी ॥१॥ ऐसे फुकाचे उपाय । सांडूनियां वांयां जाय ॥ध्रु.॥ परउपकार । एका वचनाचा फार ॥२॥ तुका म्हणे मळ । मनें सांडितां शीतळ ॥३॥