भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षोभ आणि कृपा मातेची समान । विभाग जतन करुनि ठेवी

kshobh ani krupa matechi saman | vibhag jatan karuni thevi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्षोभ आणि कृपा मातेची समान । विभाग जतन करुनि ठेवी ॥१॥ क्षणभंगुर ते उपजली चिंता । खरी अखंडीता आवडीची ॥ध्रु.॥ शिकवूं जाणे तें गोमाटियासाठी । लोभें नाहीं तुटी निश्चियेंसी ॥२॥ अघवें चि मिथ्या समया आरतें । देता तो उचितें काय जाणे ॥३॥ न करी वेव्हार गांजूं नेदी कोणा । भेडसावी तान्हें हाऊ आला ॥४॥ तुका म्हणे करी जिवासी जतन । दचकूनि मन जवळी आणी ॥५॥