भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षुधा तृषा कांहीं सर्वथा नाठवे । पहावया धांवें कोल्हांटासी

kshudha trusha kanhin sarvatha nathave | pahavaya dhanven kolhantasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्षुधा तृषा कांहीं सर्वथा नाठवे । पहावया धांवें कोल्हांटासी ॥१॥ कथेसी साक्षेपें पाचारिला जरी । म्हणे माझ्या घरीं कोणी नाहीं ॥ध्रु.॥ बलत्कारीं जरी आणिला कथेसी । निद्रा घे लोडेंसी टेंकूनियां ॥२॥ तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥