भजनी मालिका
← भजनांकडे परत

खरें नानवट निक्षेपीचें जुनें । काढिलें ठेवणें समर्थाचें

kharen nanavat nikshepichen junen | kadhilen thevanen samarthachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खरें नानवट निक्षेपीचें जुनें । काढिलें ठेवणें समर्थाचें ॥१॥ मजुराच्या हातें मापाचा उकल । मी तों येथें फोल सत्ता त्याची ॥ध्रु.॥ कुलाळाच्या हातें घटाच्या उत्पत्ती । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥२॥ तुका म्हणे जीवन तें नारायणीं । प्रभा जाते किरणी प्रकाशाची ॥३॥