भजनी मालिका
← भजनांकडे परत

खद्योतें फुलविलें रविपुढें ढुंग । साक्षी तंव जग उभयतां

khadyoten phulavilen ravipudhen dhung | sakshi tanv jag ubhayatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खद्योतें फुलविलें रविपुढें ढुंग । साक्षी तंव जग उभयतां ॥१॥ आपल्या आपण नाहीं शोभों येत । चार करी स्फीत दाखवूनि ॥ध्रु.॥ खाणार ताकाचें आसातें मांजर । आपणें चि अधीर कळों येतें ॥२॥ तुका म्हणे जळो मैंदाची मवाळी । दावूनियां नळी कापी सुखें ॥३॥