भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो

kshem deyala ho | sphuratati dand baho

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो ॥१॥ आतां झडझडां चालें । देई उचलूं पाउलें ॥ध्रु.॥ सांडीं हंसगती । बहु उत्कंठा हे चित्तीं ॥२॥ तुका म्हणे आई । श्रीरंगे विठाबाई ॥३॥