भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोपटी तळपती गाई । हाडाचीं बेडी पडेल पायीं । तोंड चुकवितां इज्जत जाई । मग वाचोनियां । काय कीजे मायबाप

kopati talapati gai | hadachin bedi padel payin | tond chukavitan ijjat jai | mag vachoniyan | kay kije mayabap

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
कोपटी तळपती गाई । हाडाचीं बेडी पडेल पायीं । तोंड चुकवितां इज्जत जाई । मग वाचोनियां । काय कीजे मायबाप ॥१॥ जोहार पाटील बाजी । चावडी चलाना कां जी । ऐसें सांगत आलों आजी । बहुत बाकीं थकली की मायबाप ॥२॥ हिमायत येथें न चले कांही । दुस्तर वार्ता पुढें भाई । वरते पाय खालीं डोई । नव महिने होईल कीं जी मायबाप ॥३॥ उगलीं कां कोंडितां गुरें । गांवीची कां बुजवितां द्वारें । फेडा झाला बरोबर । नका उणें पुरें की मायबाप ॥४॥ यंदा आली चेवाची पाळीं । तोंडें कां जी करितां काळीं । चावडी चला या वेळीं । शिव्या गाळी घेऊं नका की मायबाप ॥५॥ कुळकर्णी आपुल्या स्वाधीन करा । आडखर्चाचा ताळा धरा । दयाळु मायाळु बाप करा । येईल मुजरा निजसत्वें की मायबाप ॥६॥ विठु पाटलाचा महार चोखामेळ्याचा जोहार । सकळ संतांचा कारभार । मज नफराचे शिरीं की जी मायबाप ॥७॥