भजनी मालिका

भजने

अनुभवें पंथें निरखिता देहभाव । देह नाहीं विदेहीं म्हणो वाव । लटिका नसतां साचार कैसा ठाव । गेला गेला समूळ भवाभाव ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुसरे त्या फिरो नेदी मागे । राहे अंग संगे समागमे ॥१॥ अंगसंग असे क्रम साक्ष देव । जैसा ज्याचा भाव तैसे फळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनुसरे त्यासी फिरों नेदी मागें । राहे अंगसंगें समागमें ॥१॥ समागमें असे सर्व साक्षी देव । जैसा ज्याचा भाव तैसा राहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनुहत टिपरी घाई खेळ जाणें तो भाई रे । खोटा खेळ खेळोनि काय स्वतः अनुभव घेई रे ॥ धृ॥ मत्स्येद्रं कुळीं एक गोरख जाला । तो बहुत खेळ खेळला रे । पवन साधुनि अष्टांग योगे तेणेंचि बळें मातला रे ।

रचनाकार: संत एकनाथ

अनुहात ध्वनि वाहे सकळां पिंडीं । राम नाहीं तोंडीं कैसा तरे ॥१॥ सकळां जीवांमाजी देव आहे खरा । देखिल्या दुसरा विण न तरे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनुहात ध्वनी करित निशिदिनीं । मन हें लुब्धुनी गेलें तया ॥ १ ॥ अखंड हें मनीं स्मरा चिंतामणी । ह्रदयीं हो ध्यानीं सर्वकाळ ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

अनेक दोषांचे काट । जे जे गादले निघोंट । होती हरीनामें चोखट । क्षण एक न लगतां ॥१॥ तुम्ही हरी म्हणा हरी म्हणा । महादोषांचे छेदना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनेक पुष्पांच्या साजताती माळा । गुंजाहार गळां विलसताती ॥१॥ रक्त पितांबर आरक्त अधर । चरणीं सुंदर चा-लताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि कां हे पाक घरोघरीं ॥१॥ आपुलालें तुम्ही करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अन्यायासी राजा न करितां दंड ।बहुत ते लंड पीडी जना ॥१॥ न करितां निगा न काढितां तन । कैंची येती कण हातासी ते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अन्यायी अपराधी लडिवाळ संतांचा। तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥१॥ समर्थाचे बाळ समर्थचि जाणें। वागवी अभिमान म्हणतां त्याचे ॥२॥

रचनाकार: संत सेना

अपत्याचें हित किजे त्या जनकें । जरी वेडें मुकें जालें देख ॥१॥ तैसें मी पोसणें तुझें जिवलग । अंतरींची सांग खूण कांहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अपराध माझा क्षमा करीं रे श्रीरामा दुर्लभ देह दिधले । असतां नाहीं तुझिया प्रेमा व्यर्थ आयुष्य वेंचुनि विषयीं।

रचनाकार: संत रामदास

अपराधाच्या कोडी हीच माझी जोडी । पावनत्व प्रौढी नाम तुझें ॥१॥ द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं । धांवा त्वां घेतली गजेद्रासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव