भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुभवें वदे वाणी । अंतर ध्यानीं आपुलें

anubhaven vade vani | antar dhyanin apulen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनुभवें वदे वाणी । अंतर ध्यानीं आपुलें ॥१॥ कैंची चिका दुधचवी । जरी दावी पांढरें ॥ध्रु.॥ जातीऐसा दावी रंग। बहु जग या नाव ॥२॥ तुका म्हणे खद्योत ते । ढुंगाभोंवतें आपुलिया ॥३॥