भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुसरे त्या फिरो नेदी मागे । राहे अंग संगे समागमे

anusare tya phiro nedi mage | rahe ang sange samagame

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनुसरे त्या फिरो नेदी मागे । राहे अंग संगे समागमे ॥१॥ अंगसंग असे क्रम साक्ष देव । जैसा ज्याचा भाव तैसे फळ ॥ध्रु.॥ फळपाकी भोग देतील प्राणीये । तुका म्हणे नये सवें काही ॥२॥