भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुसरलों जिवें भावें । नेणों आपुलें पावें

anusaralon jiven bhaven | nenon apulen paven

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अनुसरलों जिवें भावें । नेणों आपुलें पावें ॥१॥ तुम्हांविण पंढरीनाथा । नाठवे कांहींच सर्वथा ॥२॥ चित्तें मनें काया वाचा । जिवीं संकल्प हा तुमचा ॥३॥ निळा म्हणे दिवस रातीं । नाहीं विसराची भ्रांती ॥४॥