भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुहत ध्वनी वरि चंद्रमा वर्तुळ

anuhat dhvani vari chandrama vartul

अनुहत ध्वनी वरि चंद्रमा वर्तुळ । तेजाचे उमाळे अनंत तेथें ॥१॥ ब्रह्मशिखरीं निराळ्या मार्गावरी । अविनाश कर्णकुमारी एकलीच ॥२॥ तेथुनी महाद्वार उन्मनीचें वर्ता । त्यावरी चढता रीग नसें ॥३॥ अणुचें जै अग्र ऐसा तेथ मार्ग । औटपीठीं सवेग जावें वरी ॥४॥ पंचदेव तेथें एकरुपां देखती । औटपीठीं वसती आरुते तेही । तयाचेही वर रश्मिअग्रामधुनी । शुध्द ब्रह्म निर्वाण असे तेथ ॥६॥ ज्ञानदेव म्हणे ब्रह्मांडींचा अंत । नाही ऐसी मात बोलतसे ॥७॥