भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुहात ध्वनि वाहे सकळां पिंडीं । राम नाहीं तोंडीं कैसा तरे

anuhat dhvani vahe sakalan pindin | ram nahin tondin kaisa tare

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनुहात ध्वनि वाहे सकळां पिंडीं । राम नाहीं तोंडीं कैसा तरे ॥१॥ सकळां जीवांमाजी देव आहे खरा । देखिल्या दुसरा विण न तरे ॥ध्रु.॥ ज्ञान सकळांमाजी आहे हें साच । भक्तीविण तें च ब्रम्ह नव्हे ॥२॥ काय मुद्रा कळल्या कराव्या सांगतां । दीप न लगतां उन्मनीचा ॥३॥ तुका म्हणे नका पिंडाचें पाळण । स्थापू नारायण आतुडेना ॥४॥