भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनेक पुष्पांच्या साजताती माळा । गुंजाहार गळां विलसताती

anek pushpanchya sajatati mala | gunjahar galan vilasatati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अनेक पुष्पांच्या साजताती माळा । गुंजाहार गळां विलसताती ॥१॥ रक्त पितांबर आरक्त अधर । चरणीं सुंदर चा-लताती ॥२॥ रक्त चंदनाची घेतलीसे उटी । मयूरपत्रवेंठी शो-भताहे ॥३॥ शिंगें रंगविती देऊनियां रंग । चालती श्रीरंग मागें मागें ॥४॥ चित्तीं सर्वकाळ राहे ऐसें ध्यान । नामा ह्मणे धन्य तो़चिं एक ॥५॥