भजनी मालिका

भजने

अनंत ब्रह्मांडें व्यापक तें नाम । अनादि निष्काम विश्वंभर ॥१॥ तोचि कृष्ण परब्रह्म द्वारकेसी । पांडवां मानसीं ठसावला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनंत हे कळा अनंत हे लीळ । अनंत जयाला वेद गाती ॥१॥ तोचि पांडुरंग पंढरीचा राजा । धणी झाला वोजा भावबळें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनंत ह्मणती माझिया स्वामीतें । अनंत गुण त्यातें ह्मणोनियां ॥१॥ पतित पावन ह्मणती माझिया स्वामीतें । उद्धरी पति-तातें म्हणोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनंता जन्मीचें चुकवीं सांकडें । काय मी बापुडें वानुं कैसें ॥१॥ सगुन गुणाची वोललिसे मूर्ति । राहो माझे चित्तीं निरंतर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनंतां जीवांचीं तोडिलीं बंधनें । मज काळें येणें कृपा कीजे ॥१॥ अनंत पवाडे तुझे विश्वंभरा । भक्तकरुणाकरा नारायणा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनंता श्रीधरा गोविंदा केशवा । मुकुंदा माधवा नारायणा ॥१॥ देवकीतनया गोपिकारमणा । भक्तउद्धरणा त्रिविक्रमा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनतांचे अनंत गुण । अपार पार हें लक्षण । तो समचरण ठेवुन । विटे उभा राहिला ॥१॥ करीं दास्यत्व काळ । भक्तजनां प्रतिपाळ । उदार आणि स्नेहाळ । तो उभा भीवरे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनंताचे मुखीं होसील गाइला । अमुप विठ्ठला दास तुम्हां ॥१॥ माझें कोठें आलें होईल विचारा । तरीं च अव्हेरा योग्य झालों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनंताच्या ऐकों कीर्ती । ज्याच्या चित्तीं हरीनाम ॥१॥ उलंघूनि गेले सिंधु । हा भवबंधु तोडोनियां ॥ध्रु.॥ आतां हळुहळु ते चि वाहीं । चालों कांही अधिकारें॥२॥

रचनाकार: संत तुकाराम