भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत ह्मणती माझिया स्वामीतें । अनंत गुण त्यातें ह्मणोनियां

anant hmanati majhiya svamiten | anant gun tyaten hmanoniyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अनंत ह्मणती माझिया स्वामीतें । अनंत गुण त्यातें ह्मणोनियां ॥१॥ पतित पावन ह्मणती माझिया स्वामीतें । उद्धरी पति-तातें म्हणोनियां ॥२॥ विश्वंभर म्हणती माझिया स्वामीतें । पोशि-तो विश्वातें ह्मणोनियां ॥३॥ जगजीवन ह्मणती माझिया स्वामीतें । जीववी जगातें ह्मणोनियां ॥४॥ ह्लषिकेश ह्मणती माझिया स्वामी- तें । चाळी इंद्रियातें म्हणोनियां ॥५॥ नामा ह्मणे केशव म्हणती स्वामीतें । नासितो क्लेशातें म्हणोनियां ॥६॥