भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत रचना हारपती ब्रह्मांडे

anant rachana harapati brahmande

अनंत रचना हारपती ब्रह्मांडे । हेळाचि वितंडे मोडीतसे ॥१॥ तें रूप राजस वसुदेव भोगी । देवक्रियेलागी वोळलेंसे ॥२॥ विचित्र रचना ब्रह्मांड कुसरी । निरालंब हरि गोकुळीं वसे ॥३॥ निवृत्ति संपदा गाताती गोविंदा । भोगिती मुकुंदा निजबोधे ॥४॥