भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत हे कळा अनंत हे लीळ । अनंत जयाला वेद गाती

anant he kala anant he lil | anant jayala ved gati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अनंत हे कळा अनंत हे लीळ । अनंत जयाला वेद गाती ॥१॥ तोचि पांडुरंग पंढरीचा राजा । धणी झाला वोजा भावबळें ॥२॥ अनंत जयाच्या सेवा वोजावणी । नामरूप गुणीं नामातीत ॥३॥ नामा ह्मणे अंत असेना जो कांहीं । सांपडतो पाहीं पंढरीये ॥४॥