भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंता श्रीधरा गोविंदा केशवा । मुकुंदा माधवा नारायणा

ananta shridhara govinda keshava | mukunda madhava narayana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अनंता श्रीधरा गोविंदा केशवा । मुकुंदा माधवा नारायणा ॥१॥ देवकीतनया गोपिकारमणा । भक्तउद्धरणा त्रिविक्रमा ॥२॥ मकर कुंडलें श्रवणीं शोभती । एकावळी दीप्ति तेजें भारी ॥३॥ नामा ह्मणे तुझा न कळेचि पार भजा निरंतर सर्वकाळ ॥४॥