भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐशी प्रपंचाची गोडी । जन्ममरण घेती कोडी

aishi prapanchachi godi | janmamaran gheti kodi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐशी प्रपंचाची गोडी । जन्ममरण घेती कोडी ॥१॥ नाहीं तया कांहीं धाक । जन्ममरणाचा देख ॥२॥ आलिया देहासी । नाठविती हृदयस्थासी ॥३॥ जरा आलिया निकटी । करी प्रपंचाची राहटी ॥४॥ एका जनार्दनीं शरण । नायकती मूर्ख जन ॥५॥