भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा आहे पांडुरंग । भोग भोगूनि निसग

aisa ahe pandurang | bhog bhoguni nisag

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसा आहे पांडुरंग । भोग भोगूनि निसग ॥१॥ अविद्येनें नवल केलें । मिथ्या सत्यत्व दाविलें ॥२॥ जैसी वांझेची संपत्ति । तैसी संसार उत्पत्ति ॥३॥ तेथें कैचि बा धरिसी । ब्रम्हीं पूर्ण जनी दासी ॥४॥