भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐशीं शांती ज्यासी आहे । त्याचे घरीं देव राहे

aishin shanti jyasi ahe | tyache gharin dev rahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐशीं शांती ज्यासी आहे । त्याचे घरीं देव राहे ॥१॥ हा अनुभव मनीं । पहा प्रत्यक्ष पुराणीं ॥२॥ धर्माघरीं वसे । अर्जुनाचे रथीं बैसे ॥३॥ अंकित दासाचा होय । एका जनार्दनीं देव ॥४॥