भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐशी अगाध चरित्रें याची । वर्णिता मागला शेष विरंची । लोक म्हणती हा सर्प बिलोंची । कैसेनि पां वांचला

aishi agadh charitren yachi | varnita magala shesh viranchi | lok mhanati ha sarpa bilonchi | kaiseni pan vanchala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐशी अगाध चरित्रें याची । वर्णिता मागला शेष विरंची । लोक म्हणती हा सर्प बिलोंची । कैसेनि पां वांचला ॥१॥ मग त्या सांगे नारायण । यासी गेलें वर्ष होऊन । गोवळ वत्सें बहमसदन । पावोनि होते बैसले ॥२॥ कालिचिं ते आले येथे । म्हणोनि सांगती नूतन वातें बहमसदन । व्दिगुणपणे हे कैसोनि तुमतें । प्राप्त झाले कां नेणां ॥३॥ ऐसें सांगता श्रीहरी । अवघ्यां जाण्वलें अंतरी । परम लाघविया मुरारी । खेळ खेळे विचित्र ॥४॥ अधासुरा वाधिल्यावरी । पुढें धेनुंका बोहरी । कैसी केली याची परी । तंहि सुजाण परिसंतु ॥५॥ एकैक याचें कथानक । श्रवण भवबंधा मोचक । म्हणोनियां सात्विक लोक । हेंचि ऐकती अनुदिनी ॥६॥ निळा म्हणें हे बाळक्रीडा परी परमार्थ साधनाचा हुंडा । श्रवण मनन होतांचि फुडा । ब्रम्हसाक्षात्कार पाविजे ॥७॥