भजनी मालिका

भजने

आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणांसाठीं होता ॥१॥ होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आला द्वारावती पाहिली कृष्णमूर्ति । जे मोक्ष विश्रांति मुमुक्षूंची ॥१॥ धरी मछावतार केला शंखोद्वार । देव मुक्तिमाहेर पांथिकाचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आला भागासी तो करीं वेवसाव । परि राहो भाव तुझ्या पायीं ॥१॥ काय चाले तुह्मीं बांधलें दातारा । वाहिलिया भारा उसंतितों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आला रे आला आला काळ निकटी । राम नाम कोटी केव्हां जपसी ॥१॥ बाळ तरुण वृद्ध दशा ती पावली । काळाची पडली छाया अंगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आलासी पाहुणा नरदेहीं जाणा । चुकवी बंधनापासूनियां ॥१॥ वाउगाची सोस न करीं सायासा । रामनाम सौरसा जप करीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आलासी पाहुणा नरदेहीं जाणा । चुकवी बंधनापासूनियां ॥१॥ वाउगाची सोस न करी सायास । रामनामें सौरसा जप करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ