भजनी मालिका
← भजनांकडे परत

आला वनमाळी । मग भेटती सकळी

ala vanamali | mag bhetati sakali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आला वनमाळी । मग भेटती सकळी ॥१॥ यशोदा रोहिणी । पोटीं धरिती चक्रपाणी ॥२॥ गायी धांवताती । कृष्ण अंगातें चाटिती ॥३॥ उडया मारिताती । गडी आनंदें नाचती ॥४॥ न वर्णवे तो आनंद । नामयाची बुद्धि मंद ॥५॥