भजनी मालिका
← भजनांकडे परत

आला रे आला आला काळ निकटी । राम नाम कोटी केव्हां जपसी

ala re ala ala kal nikati | ram nam koti kevhan japasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आला रे आला आला काळ निकटी । राम नाम कोटी केव्हां जपसी ॥१॥ बाळ तरुण वृद्ध दशा ती पावली । काळाची पडली छाया अंगीं ॥२॥ यातायाती करतां जन्म वायां गेला परी नाहीं वदला मुखीं राम ॥३॥ एका जनार्दनीं फजितखोर जिणें । सवेंचि मरणें पुढती जन्म ॥४॥