भजनी मालिका
← भजनांकडे परत

आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणांसाठीं होता

ala tyancha bhav devachiya mana | antarin karanansathin hota

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणांसाठीं होता ॥१॥ होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥२॥ आधीं पाठीमोरीं झालीं तीं सकळें । मग या गोपाळें बुडी दिली ॥३॥ दिली हाक त्याणें जाऊनि पाताळा । जागविलें काळा भुजंगासि ॥४॥ भुजंग हा होता निजला मंदिरीं । निर्भर अंतरीं गर्वनिधि ॥५॥ गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचें ॥६॥ चेंडुवाचे मिसें काळया नाथावा । तुका म्हणे देवा कारण ॥७॥