भजनी मालिका
← भजनांकडे परत

आला पुडंलिंकासाठी । उभा सम पाय विटीं

ala pudanlinkasathi | ubha sam pay vitin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आला पुडंलिंकासाठी । उभा सम पाय विटीं ॥१॥ विठु मदनाचा पुतळा । भुलवणा तो सकळा ॥२॥ अराध्य दैवत शिवाचें । कीर्तनीं उघदाची नाचे ॥३॥ एका जनार्दनीं मन । वोवाळावें पायांवरुन ॥४॥