भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलासी पाहुणा नरदेहीं जाणा । चुकवी बंधनापासूनियां

alasi pahuna naradehin jana | chukavi bandhanapasuniyan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आलासी पाहुणा नरदेहीं जाणा । चुकवी बंधनापासूनियां ॥१॥ वाउगाची सोस न करी सायास । रामनामें सौरसा जप करी ॥२॥ यज्ञयागादिकक न घडतां साधनें । न्युन पडतां पतन सहज जोडे ॥३॥ एका जनार्दनीं चुकवी येरझार । करीं तूं उच्चार रामनाम ॥४॥