भजनी मालिका

भजने

आपला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥१॥ येर तीं माइकें दुःखाचीं जनितीं । नाहीं आदिअंतीं अवसानी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपलाल्या तुम्ही रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥१॥ हें तों नव्हे देहबुद्धीचें कारण । होईल नारायणें दान केलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपलीं धणी पुरेंतों घ्यावें । उरले ठेवावें तैसेचि ॥१॥ भरला आहे हा सागर । नलगे अंतपार कोणासी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आपलें हित आपण नेणती । पुढिलांतें सांगती बहु ज्ञान ॥१॥ नेणोनि परब्रह्म जाणते झाले । अभावीं गुंतले माया-जाळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आपुला तो देह आम्हां उपेक्षीत । कोठें जाऊं हित सांगों कोणा ॥१॥ कोण नाहीं दक्ष करितां संसार । आह्मीं हा विचार वमन केला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपुला न टाकीं पां आचार । उपजले कुळींचा वेव्हार । स्वधर्म तो सार । पाळीं पाळीं बापा ॥१॥ त्यातें म्हणणें संसार । येर बोलणें असार । निष्ठावंत जे नर । देवाचि समान ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आपुला विचार न कळे जयांसी । ते या संसाराशी पशू आले ॥१॥ पशूचा उपयोग बहुतांपरी आहे । हा तो वायां जाय नरदेह ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥१॥ खेळु मांडियेला यमुने पाबळीं । या रे चेंडुफळी खेळूं आतां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आपुलिया अंगें साहित्य श्रीरंगें । पुजियेले सांग संतसाधू ॥१॥ निवृत्तिदेवें केली विठोबाची पूजा । उभारिल्या ध्वजा पताकांच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आपुलिया आंगें तोडी मायाजाळ । ऐसें नाहीं बळ कोणापाशीं ॥१॥ रांडापोरें त्याग करी कुटुंबाचा । नावरे हे वाचा आणि मन ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपुलिया घरा जाती मुकवत । नाहीं दुजा हेत चित्तीं कांहीं ॥१॥ परस्परें बोल बोलती अबळा । कैशीं नवल कळा देखियली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥१॥ साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम