भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपलाल्या तुम्ही रूपासी समजा । कासया वरजा आरसिया

apalalya tumhi rupasi samaja | kasaya varaja arasiya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपलाल्या तुम्ही रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥१॥ हें तों नव्हे देहबुद्धीचें कारण । होईल नारायणें दान केलें ॥ध्रु.॥ अब्रूचिया बाणें वर्मासि स्पर्शावें । हें तों नाहीं ठावें मोकलित्या ॥२॥ तुका म्हणे बहु मुखें या वचना । सत्याविण जाणा चाल नाहीं ॥३॥