भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपला गुणग्राम सांडूनियां गेलिये

apala gunagram sanduniyan geliye

आपला गुणग्राम सांडूनियां गेलिये । निवांत राहिलिये निर्गुणी वो माय ॥१॥ परोपरी पहातां सर्वरुपीं गोपाळ । तो मजपासीं परी खेळ न लगतां वो माय ॥२॥ अनुवाद खुंटला सर्वांगे भेटला । गुणग्राम तुटला सहज वो माय ॥३॥ ऐसें म्यां रुप आपुलें आपणचि केलें । रखुमादेवीवरे विठ्ठलें वो माय ॥४॥