भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपल्याच फुंदे । जेथें तेथें घेती छंदें

apalyach phunde | jethen tethen gheti chhanden

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपल्याच फुंदे । जेथें तेथें घेती छंदें ॥१॥ पडिला सत्याचा दुष्काळ । बहु फार जाली घोळ ॥ध्रु.॥ विश्वाचे माठ । त्याचे कपाळीं तें नाट ॥२॥ तुका म्हणे घाणा । मूढा तीर्थी प्रदिक्षणा ॥३॥