भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपलें हित आपण नेणती । पुढिलांतें सांगती बहु ज्ञान

apalen hit apan nenati | pudhilanten sangati bahu dnyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आपलें हित आपण नेणती । पुढिलांतें सांगती बहु ज्ञान ॥१॥ नेणोनि परब्रह्म जाणते झाले । अभावीं गुंतले माया-जाळीं ॥२॥ जीव आणि शीव एकरूप ह्मणती । सेवेसी अंतरती केशवाचे ॥३॥ नामा ह्मणे तोचि केशवातें जाणतां । केशव ह्मणतां मुक्त होय ॥४॥