भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपाजी गोसावी वाचोनीया पत्र

apaji gosavi vachoniya patra

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
आपाजी गोसावी वाचोनीया पत्र । क्रोधें फार नेत्र भोवंडीत ॥ १ ॥ शुद्र होवोनिया नमस्कार घेत । पाप हें अद्‌‍भुत होत असे ॥ २ ॥ सोनाराच्या जाती म्हणविती ब्राह्मण । तयाचें दर्शन घेऊं नये ॥ ३ ॥ शूद्राचा अनुग्रह घेताती ब्राह्मण । भ्रष्टाकार पूर्ण होत असे ॥ ४ ॥ त्यासी शिक्षा द्यावी दोष नाहीं यासी । ऐसा निश्चयेंसी नेम केला ॥ ५ ॥ बहिणी म्हणे याचें प्रत्युत्तर लिहिलें । होय यथाकालें कार्यसिद्धी ॥ ६ ॥