भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपलीं धणी पुरेंतों घ्यावें । उरले ठेवावें तैसेचि

apalin dhani purenton ghyaven | urale thevaven taisechi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आपलीं धणी पुरेंतों घ्यावें । उरले ठेवावें तैसेचि ॥१॥ भरला आहे हा सागर । नलगे अंतपार कोणासी ॥२॥ उदंड मागें झाले सुखी । आतां ही आणखी पावतील ॥३॥ निळा म्हणे नित्य नवा । आहे हा ठेवा जुगादीचा ॥४॥