भजनी मालिका

भजने

आप तेज वायु पृथ्वी आणि गगन । त्यांचें बा केलें श-रीरनिधान ॥१॥ त्यामाजीं घातलें मन पवन । पिंडब्रह्मांड केली रचना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आप तेज वायू पृथिवी गगन । मेलें तें कवण पंचामध्यें ॥१॥ आम्हां मरण नाहीं मरशील काई । आत्मवस्तु पाही श्रीगुरुमुखें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आपण चाळक बुद्धीच्या संचारा । आम्हांसी वेव्हारा पात्र केलें ॥१॥ काय झालें तरी नेघा तुम्हीं भार । आणीक कोणां थोर म्हणों सांगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपणची कर्ता आपणची मित्र । आपण सर्वत्र हरी झाला ॥१॥ साधन साधितां हरि दिसे पूर्ण । प्रपंच हें भान न देखें डोळां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आपणा आपण पाहे विचारुनी विचारतां मनी देव तुंचीं ॥१॥ तूंचि देव असतां फिरशी वनोवनीं । प्रगटली काहाणी बोलायासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आपणा लागे काम वाण्याघरीं गुळ । त्याचे याति कुळ काय कीजे ॥१॥ उकरड्यावरी वाढली तुळसी । टाकावी ते कैसी ठायागुणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपणा वेगळा कशाला निवडिसी । कां सज दवडिसी सांग नाम्या ॥१॥ बरवें पुत्रपण जालासी उत्तीर्ण । आतां अभिमान पाहें माझाअ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आपणा वेगळा कशाला निवडिसी कां मज दवडिसी सांग नाम्या ॥१॥ बरवें पुत्रपण जालासी । उत्तीर्ण। आतां अभिमान पाहें माझा ॥२॥

रचनाकार: संत गोणाई

आपणा समान केलें त्यासी । धरिलें ज्यासी निजहातीं ॥१॥ ऐसा देवो कृपासिंधु । म्हणोनि बंधु दीनांचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा