भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपणा आपण पाहे विचारुनी विचारतां मनी देव तुंचीं

apana apan pahe vicharuni vicharatan mani dev tunchin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आपणा आपण पाहे विचारुनी विचारतां मनी देव तुंचीं ॥१॥ तूंचि देव असतां फिरशी वनोवनीं । प्रगटली काहाणी बोलायासी ॥२॥ देहींचे देवळीं आत्माराम नांदे । भांबावला भक्त हिंडे सदा रानें ॥३॥ एका जनार्दनें भ्रमाची गोष्टी । वायांचि शिणती होती कष्टी ॥४॥